Election | भाजपचे 27 नगरसेवक गळाला लागल्याचा शिवसेनेचा दावा, जळगावातील 'ते' नगरसेवक ठाण्यामध्ये?
जळगाव : जळगाव महानगरपालिकेसाठी आज महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होत आहे. निवडणूक जळगाव शहराची असली तर दोन्ही पक्षातील अनेक नगरसेवक हे ठाणे आणि नाशिकमधून मतदान प्रक्रियेत ऑनलाईन पद्धतीने सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनपाच्या आच्या महापौर निवडणुकीच्या अगोदरच सत्ताधारी भाजप मधील काही नाराज नगरसेवक गळाला लागल्याचा दावा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर गेल्या तीन दिवस पासून हे सर्व नगरसेवक मुंबईत अज्ञात ठिकाणी सहलीवर असल्याचं सांगण्यात येत आहे.