Pandharpur By Election Results : पंढरपूर निवडणुकीबाबत सतेज पाटील आणि चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

पाच राज्यांच्या निवडणुकीसह पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालांचे कल हाती येत आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात जोरदार मुसंडी मारली आहे. यावर विषयावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री छगन भुजबळांनाच इशारा दिला आहे. छगन भुजबळांनी बंगालच्या निकालावरुन भाजपवर टीका केली होती. याबाबत बोलताना पाटील म्हणाले की,  छगन भुजबळांनी पंढरपूरवर प्रतिक्रिया द्यावी, जामिनावर सुटलेला आहात, तुम्ही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळं तुम्ही फार जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. बोलायचं असेल पंढरपूर, आसाम, पुद्दुचेरीवर बोला, असं ते म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola