Rajya Sabha Election 2022 : राज्यसभा निवडणुकीसाठी 'मविआ' ची खास रणनीती

Rajya Sabha Election 2022 : राज्यात राज्यसभा निवडणुकीचा धुरळा उडाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज (10 जून) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सहाव्या जागेसाठी निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता असल्याने एक एक मत महत्त्वाचं आहे. छोटे पक्ष आणि अपक्ष या निवडणुकीत किंगमेकर ठरणार असल्याने त्यांचं मत कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता आहे. त्यातच एमआयएमने महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करणार असल्याचं जाहीर केलं. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. परंतु महाविकास आघाडीला मत देताना त्यांनी काही अटी देखील ठेवल्या आहेत. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola