Rahul Shewale On Amit Shah Meeting |एकनाथ शिंदेंचा आदर राखून पुढचे निर्णय घेतले जातील

Rahul Shewale On Amit Shah Meeting |एकनाथ शिंदेंचा आदर राखून पुढचे निर्णय घेतले जातील

राज्यात काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी दिल्याचा जीआर काढण्यात आला होता. प्रशासनाने काढलेला हा जीआर योग्य नसून त्याचे औचित्य आणि नियमाधीनता याची चौकशी करण्याचे आदेश दिले जातील असं भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं आहे. 

राज्य सरकारनं वक्फ बोर्डाला दहा कोटी रुपये निधी देण्याचा शासन निर्णय जारी केल्यानंतर लागलीच मागे घेतला. राज्यात काळजीवाहू सरकार असताना अशा प्रकारे धोरणात्मक निर्णय घेता येत नसतानाही, प्रशासकीय पातळीवर वक्फ बोर्डाला निधी देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे या निर्णयावर जोरदार टीका होताच राज्य सरकारवर हा जीआर मागे घेण्याची नामुष्की आली आहे. याबाबत त्याची चौकशी करण्यात येईल असं देवेंद्र फडणवीसांनी एक्सवर पोस्टवर सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola