Prajwal Revanna Defeated : अत्याचाराचे आरोप...महिनाभर गायब, असलेला प्रज्वल रेवण्णा पराभूत
बंगळुरू : कर्नाटकच्या निवडणुकीत आणि महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारात चर्चेचा मुद्दा ठरलेल्या एनडीए आघाडीचे उमेदवार आणि अटकेत असेलला आरोपी प्रज्वल रेवण्णाचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. जेडीएसमधून निलंबित करण्यात आलेला हसन लोकसभा मतदारसंघाचा खासदार आणि महिला अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला प्रज्वल रेवण्णा (Prajwal Revanna) पराभूत झाल्याची माहिती आहे. गेल्याच आठवड्यात जर्मनीतून भारतात आल्यानंतर प्रज्वल यास कर्नाटक पोलिसांनी (Karnataka Police ) बंगळुरु विमानतळावरुन अटक केली आहे. दरम्यान, आज हाती आलेल्या निकालानुसार (Loksabha Result) कर्नाटकच्या हसन लोकसभा मतदारसंघातून प्रज्ज्वल रेवण्णाचा पराभव झाल्याचं दिसून येत आहे.
यंदाच्या निवडणुकीत प्रज्वल रेवण्णाचा मुद्दा चांगलाच गाजला होता. भाजप नेत्यांनाही या मुद्द्यावरुन प्रचाराला सामोरे जाताना अडचण आल्याचं दिसून आलं. कर्नाटकसह देशभरात प्रज्ज्वल रेवण्णाच्या मुद्द्यावरुन रणकंदन घडलं होतं. आता, निवडणूक निकालात जनतेनं नाकारल्याचं दिसून येत आहे. दुपारी 12.45 वाजेपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार प्रज्वल रेवण्णा यास 4 लाख 91 हजार 067 मत मिळाली आहेत. तर, काँग्रेस उमेदवार श्रेयस पटेल यांना 5 लाख 14 हजार 485 मतं मिळाली आहे. त्यामुळे, सध्या 23,418 मतांसह पटेल आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. मात्र, हाती आलेल्या माहितीनुसार प्रज्ज्वल रेवण्णाचा पराभव झाल्याची माहिती आहे.