एकाच वेळी दोन जबाबदाऱ्या; शरद पवार रुग्णालयात, सुप्रिया सुळेंचं 'ब्रीच कॅण्डी'च्या गेटवरुन भाषण

Continues below advertisement

मुंबई : एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात, त्यात राष्ट्रवादीसाठी महत्त्वाची पोटनिवडणूक म्हणजे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघ. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार एकाच वेळी घराची आणि पक्षाची जबाबदारी यशस्वरित्या सांभाळताना दिसत आहेत. आजारी वडिलांसोबत राहून त्या पंढरपुरातील प्रचारसभेत व्हर्चुअल सहभागी झाल्या. ब्रीच कॅण्डी रुग्णालयाच्या गेटवर उभं राहून त्यांनी भाषण केलं आणि पंढरपुरातील सभा गाजवली.

आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर इथे निवडणूक लागली. 17 एप्रिल रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. प्रचाराचे शेवटचे काही दिवस आहेत. भारत भालके यांचा मुलगा भगीरथ भालके राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे यांनी या आधी पंढरपूर आणि मंगळवेढ्यात जाऊन सभा घेतल्या तर दुसरीकडून देवेंद्र फडणवीस प्रचार सभा घेत आहेत. अशा वेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या मात्र शरद पवार रुग्णालयात दाखल असल्याने मुंबईतच आहे. त्या पंढरपूरला जाऊ शकत नसल्याने मुंबईतून त्यांनी प्रचार सभेला उद्देशून भाषण केले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram