Navi Mumbai Corporation : नवी मुंबईत महाविकास आघाडीचं ठरलं! महापालिका निवडणूक एकत्र लढणार ABP Majha
नवी मुंबईत महाविकास आघाडीचं ठरलंय! नवी मुंबईत तीनही पक्ष महापालिका निवडणूक एकत्र लढणार आहेत. त्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा जागावाटपाचा फॉर्म्युलाही निश्चित झालाय. शिवसेनेचे नेते विजय नहाटा, विजय चौगुले, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, संदीप सुतार यांच्यात झालेल्या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. त्यामुळे नवी मुंबईत भाजप विरुद्ध महाविकास आघाडीत रणसंग्राम रंगणार आहे.