Narayan Rane Lok Sabha : नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरणार
Continues below advertisement
मुंबई: काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी मंगळवारी भाजपमध्ये रितसर प्रवेश केला. भाजपकडून त्यांना आता राज्यसभेवर पाठवले जाणार आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. केंद्रीय मंत्री असलेले नारायण राणे (Narayan Rane) राज्यसभेतून निवृत्त झाल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळणार का, याकडे सगळ्याचे लक्ष लागले होते. परंतु, अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या भाजप प्रवेशाने सर्व समीरकरणे बदलली आहेत. भाजपला कोणताही धोका न पत्कारता अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवायचे आहे. उर्वरित दोन जागांवर वर्णी लागण्यासाठी भाजपमध्ये प्रचंड अंतर्गत रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे नारायण राणे आणि पियूष गोयल या दोन राज्यसभेच्या खासदारांना यंदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाणार आहे.
Continues below advertisement