Narayan Rane Election Result : वडिलांचा विजय, आईला मायेची मिठी,नितेश राणेंचं जंगी सेलिब्रेशन
Lok Sabha Election Result 2024 Raj Thackeray: लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election Result 2024) मतमोजणीची प्रक्रिया सर्वत्र सुरु आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या (Maharashtra Lok Sabha Seat) 48 जागा आहेत. या जागांवर महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (MVA) कांटे की टक्कर आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत हाती आलेल्या कलानूसार कोण आघाडीवर व कोण पिछाडीवर आहे, जाणून घ्या...हा कल दुपारी 12 वाजेपर्यंतचा असून अजून अंतिम निकाल हाती येण्यास काही वेळ लागेल.
लोकसभा 2024 च्या निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला. या पाठिंब्यानंतर ठाणे, कल्याण, पुणे आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत महायुतीची सांगता सभा झाली. सध्या राज ठाकरेंनी सभा घेतलेल्या ठिकाणी महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
राज ठाकरेंनी कुठे-कुठे सभा घेतल्या?
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजप आणि महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंनी कणकवलीत सभा घेतली. तर पुणे लोकसभा मतदारसंघाचे भाजप आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंनी पुण्यात सभा घेतली. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना आणि महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांचयासाठी राज ठाकरेंनी कळव्यात सभा घेतली होती.