Mahayuti CM : महायुतीचा महातिढा, मुख्यमंत्रीपदाचं घोडं अडलं कुठे?

Continues below advertisement

Mahayuti CM : महायुतीचा महातिढा, मुख्यमंत्रीपदाचं घोडं अडलं कुठे?

नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीने (Mahayuti) 288 पैकी 236 जागा जिंकत नवा इतिहास रचला आहे. महायुतीच्या महालाटेत महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) अक्षरशः धुव्वा उडाला. महायुतीचा 236 जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर यश मिळाले. नाशिक जिल्ह्यात शरद पवार गटाने पाच जागा लढवल्या. मात्र एकही जागा शरद पवार गटाला जिंकता आली नाही. त्यामुळे नाशिकमध्ये नाशिकमध्ये शरद पवारांची (Sharad Pawar) 'पॉवर' फेल ठरल्याचे दिसून येत आहे.

शरद पवार यांच्या शब्दावर नाशिक जिल्ह्याने 1985 साली तब्बल 14 आमदार निवडून देण्याची किमया केली होती. त्यामुळे नाशिक आणि शरद पवार हे एक समीकरण दृढ झाले. जिल्ह्यात शरद पवार यांना माननारा मोठा वर्ग आहे. राष्ट्रवादीतील फाटाफुट झाल्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्ह्यतील सहाही आमदार अजित पवार गटात गेले. परंतु काही मंडळींनी शरद पवारांची साथ संगत करत राष्ट्रवादीची फेर बांधणी केली. त्याचा परिणाम यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जाणवला. नाशिक, दिंडोरी आणि धुळे या तिन्ही लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने झेंडा फडकविला. परिणामी विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात शरद पवार यांच्या पक्षाकडून निवडणूक लढविणाऱ्यांच्या इच्छुकांत मोठी रस्सीखेच निर्माण झाली होती. एकाच जागेसाठी डझनभर इच्छुक पुढे आले. परंतु आता प्रत्यक्ष निकालानंतर काकांपेक्षा पुतण्याच भारी ठरल्याचे चित्र आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram