Maharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू


Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Election Result Mahayuti Against MVA Political fight ABP Majha 
Maharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू
मुंबई : राज्यातील 288 विदधानसभा मतदारसंघातील निकालाची आकडेवारी समोर येत असून भाजपने पहिल्याच फेरीत मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात 93 पेक्षा अधिक जागांवर आघाडी घेत भाजपच मोठा भाऊ ठरत असल्याचे पाहायला मिळते. तर, महायुतीने मॅजिक फिगर गाठला असून पहिल्या फेरीतील कौल महायुतीच्या बाजुने असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री आघाडीवर असल्याची माहिती आहे. राज्यात सत्तास्थापनेसाठी 288 जागांपैकी 145 जागांवर मॅजिक फिगरचा आकडा आहे. त्यामुळे, सत्तास्थापनेसाठी कोणत्याही युती व आघाडीला 145 चा आकडा गाठावा लागणार आहे. निकालाचे पहिले कौल हाती आले असून बहुतांश जिल्ह्यात भाजपला आघाडी दिसून येते. भाजप महायुतीने दीडशतकाच्या जवळपास झेप घेतल्याचं दिसून येतं.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola