Maharashtra Vidhan Sabha : तुमच्या मतदारसंघाची बातमी : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 22 October 2024

Maharashtra Vidhan Sabha : तुमच्या मतदारसंघाची बातमी : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 22 October 2024

परभणी जिल्ह्यात पहिल्याच दिवशी विक्रमी उमेदवारी अर्ज खरेदी, ४ विधानसभा मतदारसंघात ७४ भावी आमदारांकडून १४४ उमेदवारी अर्जांची खरेदी. 

पहिल्या दिवशी बीड तहसील मधून 145 तर परळी तहसील मधून 49 उमेदवारी अर्जांची विक्री, परळीत  राजेभाऊ फड यांनी दाखल केला पहिला उमेदवारी अर्ज, बीडमधून एकाही उमेदवाराचा अर्ज नाही.

लोकसभा निवडणुकीनंतर मतदारसंख्येत ३५ लाखाने वाढ,  विधानसभा निवडणुकीसाठी ३५ लाख ६२ हजार ६८ मतदार वाढले, प्रत्येक मतदारसंघांत दहा हजार मतदार वाढल्याचा आरोप. 

माजी खासदार निलेश राणे उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार, घोषणेनंतर सोशल मीडिया प्रोफाईलवर  शिवसेनेचा लोगो केला अपलोड. 

गणेश नाईकांचे चिरंजीव संदीप नाईक यांनी जयंत पाटलांच्या उपस्थित हाती घेतली तुतारी, मंदा म्हात्रेंविरोधात निवडणूक लढण्याची शक्यता, २५ माजी नगरसेवकांसह केला शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश. 

कुस्तीगीर संघटनेचे अनेक पैलवान राष्ट्रवादीत,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश. 

मंत्री दादा भुसे यांचे निकटवर्तीय उदय सांगळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात. सांगळे यांनी शरद पवार, जयंत पाटील यांच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश. सिन्नरमधून सांगळे राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात लढण्याची शक्यता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola