Maharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणती
Maharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणती
राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघात निवडणूक निकालाची सुरुवात झाली असून अत्यंत चुरशीची लढत यंदा पाहायला मिळत आहे. यंदाच्या निवडणूक निकालानंतर राज्यात इतर व अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरेल, असेच दिसून येते. इतर व अपक्षांचा आकडा वाढल्यास राज्यात किंगमेकरच्या भूमिकेत राहू शकतात. मात्र, याबाबतचे चित्र निवडणूक निकालाच्या अंतिम आकडेवारीनंतरच स्पष्ट होईल.
हे ठरू शकतात पहिले विजयी उमेदवार
महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार आणि 99 विधानसभेच्या रिंगणात असलेले भाजपचे नेते कालिदास कळमकर हे यंदाच्या निवडणुकीत पहिला विजयाची नोंद करण्याच्या तयारीत आहेत. वडाळा मतदारसंघात कालिदास कोळमकर यांनी मोठी आघाडी घेतली आहे पहिल्या कलानुसार कालिदास कोळमकर जवळपास 12000 मतांनी आघाडीवर आहेत, या मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार श्रद्धा जाधव आहेत.