मुंबई वगळता इतर महानगरपालिकांमध्ये 3 सदस्यीय प्रभाग पद्धत, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
महापालिकेची निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने घेण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक प्रभागाचा भौगोलिक विस्तार चांगलाच वाढणार आहे. स्थानिक पातळीवर द्वि आणि त्रिस्तरीय प्रभाग रचनेचा अनुभव असणाऱ्या राजकीय पक्षांना या घडामोडींमुळे नव्याने व्यूहरचना करणे भाग पडणार आहे. नव्याने अस्तित्वात येणाऱ्या अवाढव्य प्रभागात निवडून येणाऱ्या सदस्यांमध्ये समन्वय नसल्यास त्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागू शकतो.