Grampanchayat Election | कोल्हापूरच्या साकेमध्ये निवडणुकीआधी गावकरी घेतात शपथ, काय आहे प्रकार?
Continues below advertisement
Maharashtra Gram Panchayat Elections 2021 : राज्यातील जनतेचे लक्ष लागून असलेल्या 14 हजार गावांमध्ये राजकीय धुरळा उडणार आहे. राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार काल थांबला. उद्या शुक्रवार, 15 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन देखील सज्ज झालं आहे. मतदान प्रक्रियेसाठी आज (गुरुवारी) दुपारी प्रत्येक तहसील कार्यालयाच्या वतीने मतदान केंद्रांवर ईव्हीएम (EVM) मशिन्स तसेच मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली सामग्री रवाना करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लाखो कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये महसूल प्रशासनासह शिक्षकांचा समावेश आहे.
Continues below advertisement