Jammu Kashmir Election : जम्मू-काश्मिरच्या निवडणुकीत फुटीरतावादी नेत्यांना मतदान? खास चर्चा

Continues below advertisement

Jammu Kashmir Election : जम्मू-काश्मिरच्या निवडणुकीत फुटीरतावादी नेत्यांना मतदान? खास चर्चा

Jammu Kashmir Vidhan Sabha Results 2024: जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभेच्या (Jammu Kashmir Vidhan Sabha Results 2024) 90 जागांसाठी सध्या मतमोजणी सुरू आहे. जम्मू आणि काश्मीरच्या या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्स आघाडी, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात मुख्य लढत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील जवळपास सर्व मतमोजणीचे सर्व कल हाती आले आहेत. 

जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu Kashmir Vidhan Sabha Results 2024) 90 जागांपौकी सध्या नॅशनल कॉन्फरन्स 35, भाजप 28, काँग्रेस 14, पीडीपी 3 आणि इतर 10 जागांवर आघाडीवर आहे. भाजपसाठी जम्मू आणि काश्मीरची ही निवडणूक महत्वाची होती. कारण जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवल्यानंतर आणि तेथून कलम 370 हटवल्यानंतर ही निवडणूक झाली. कलम 370 हटविल्यानंतर तत्कालीन जम्मू आणि कश्मीर राज्यापासून लडाख आणि लेह यांना वेगळे करुन केंद्र शासित प्रदेशात त्याचे रुपांतर करण्यात आल्याने याचा भाजपला फायदा होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र जम्मूमध्ये भाजपला अल्प प्रतिसाद मिळाला, तर काश्मीर खोऱ्यातही भाजपची झोळी रिकामीच राहणार असल्याचं दिसून येत आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram