Jammu And Haryana Election Result : कलांनुसार हरियाणात 6 अपक्ष आघाडीवर, अपक्षांपैकी 3 भाजप बंडखोर
Jammu And Haryana Election Result : कलांनुसार हरियाणात 6 अपक्ष आघाडीवर, अपक्षांपैकी 3 भाजप बंडखोर
चंदीगढ: हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी दीड वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार, विधानसभेच्या एकूण 90 जागांपैकी 51 जागांवर भाजप, 34 मतदारसंघांमध्ये काँग्रेस, लोक दल 2 आणि तीन जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. हरियाणा विधानसभेत (Haryana Elections Results 2024) सत्तास्थापन करण्यासाठी 46 ही मॅजिक फिगर आहे. सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास हरियाणात भाजप (BJP) सहजपणे सत्ता स्थापन करेल.
भाजपने या निवडणुकीत विजय मिळवल्यास हरियाणात तिसऱ्यांदा त्यांची सत्ता येईल. हरियाणात आतापर्यंत एकदाही तिसऱ्यावेळी एकाच पक्षाचे सरकार निवडून आलेले नाही. त्यामुळे भाजपचा हरियाणातील विजय अनेक अर्थांनी महत्त्वाचा मानला जात आहे. 1980 साली भाजपची स्थापन झाल्यानंतर पक्ष पहिल्यांदा हरियाणात मैदानात उतरला होता. 1982 साली हरियाणात भाजपने सहा जागा जिंकल्या होत्या. 1986 मध्ये भाजपने 16, 1996 मध्ये 11, 2000 मध्ये 6 आणि 2005 साली भाजपला अवघ्या दोन जागांवर विजय मिळाला होता. तर 2014 साली भाजपने 33.3 टक्के मिळवत सर्वाधिक 47 जागा मिळवल्या होत्या. परंतु, यंदाच्या निवडणुकीत भाजप हा विक्रमही मोडू शकतो. सध्या भाजप तब्बल 51 जागांवर आघाडीवर आहे. सध्याचा ट्रेंड कायम राहिल्यास भाजपची ही हरियाणा विधानसभा निवडणुकीतील आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी असेल.