Gram Panchyat Election 2023 : राज्यभरातल्या 2 हजार 369 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार : ABP Majha

Continues below advertisement

राज्यभरातल्या २ हजार ३६९ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. तर २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकाही होत आहेत.  संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान करता येणार . तर मतमोजणी उद्या होणार आहे. मात्र गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी 7.30 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे.. गडचिरोली आणि गोंदिया या नक्षलग्रस्त भागात 7 नोव्हेंबर 2023 रोजी मतमोजणी होईल. राज्यात महापालिका निवडणुका रखडल्या आहेत. मात्र आगामी लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने यावेळी जनतेचा कौल कोणाकडे आहे हे या निवडणुकांतून आजमावता येणार आहे. त्यामुळे या निवडणुकांना महत्त्व आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram