Grampanchayat Election | बार्शीत धोत्रे गावचा कारभार सीमेवर देशाची सेवा केलेल्या माजी सैनिकांच्या हाती!
सोलापूर : देशाच्या सीमेवर आपल्या सर्वांचं रक्षण सैनिक करत असतात. सैन्यात सेवा बजावून आपल्या घरी परतलेल्या याच माजी सैनिकांचा अनोखा सन्मान बार्शीकरांनी केलाय. गावातील ग्रामपंचायतीचा सर्व कारभार माजी सैनिक आणि माजी सैनिकांच्या पत्नी ह्यांच्या हाती सोपवण्यात आला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण धोत्रे गावाने एकमताने आणि बिनविरोधपणे हा निर्णय घेतला आहे.