बिनविरोध निवडणूक लढवा, 25 लाख मिळवा! अहमदनगरच्या पारनेरमध्ये आमदार निलेश लंकेंची अनोखी शक्कल
अहमदनगरला पारनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हाव्या यासाठी आमदार निलेश लंके यांनी अनोखी शक्कल लढवली आहे. ज्या गावातील नागरीक ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून शासनाच्या खर्च वाचवितील, त्या गावांना आमदार निधीतून 25 लाखांचा निधी देण्याची घोषणा लंके यांनी केली आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या या निर्णयाच कौतूक केलं जातंय. राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणूका येत्या 15 जानेवारी रोजी पार पडणार असून सरपंचपदाचे आरक्षण मतदानानंतर होणार आहे. लंके यांच्या पारनेर मतदार संघातील 110 ग्रामपंचायतींचाही त्यात समावेश असून ज्या गावातील नागरीक ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करून शासनाच्या खर्च वाचवितील, गावातील एकात्मता कायम राखून प्रशासनावरचा ताण कमी करतील त्या गावांना आमदार निधीतून 25 लाखांचा निधी देण्याची घोषणा लंके यांनी केली आहे.