Election Result 2023 : मध्य प्रदेशच्या विजयानंतर Jyotiraditya Scindia यांनी मानले जनतेचे आभार

Continues below advertisement

Election Result 2023 : मध्य प्रदेशच्या विजयीनंतर Jyotiraditya Scindia यांनी मानले जनतेचे आभार 

MP Election Results 2023 : लोकसभेची (Loksabha Election) सेमीफायनल पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निमित्ताने पार पडली. यामध्ये भाजपला (BJP) सर्वाधिक लक्षणीय यश मध्य प्रदेशात (MP Election Results 2023) मिळालं आहे. मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Shinde) यांनी बंडाळी केल्यानंतर काँग्रेस (Congress) सरकार उलथवून भाजपने सरकार स्थापन केले होते. त्यामुळे या निवडणुकीत भाजपला फटका बसणार का? काँग्रेस पुन्हा सत्ता मिळवणार का? अशी चर्चा रंगली होती. मात्र, निकालानंतर पुन्हा एकदा राज्यातील जनतेनं भाजपला कौल देताना मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

'लाडली बहना योजना' ठरली टर्निंग पाँईंट (Ladli Behna Yojana) 

असे असले तरी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांना राज्यात तिकिट वाटपात स्वत:लाच करावी लागलेली प्रतीक्षा आणि तसेच कोणताही न दिलेला मुख्यमंत्रिपदाचा यामुळे पुन्हा संधी मिळणार की नाही? याची चर्चा रंगली असताना त्यांच्या एका योजनेची चर्चा नक्कीच रंगली आहे. त्या योजनेचं नाव 'लाडली बहना योजना' (Ladli Bahana Yojna) आहे. मध्य प्रदेशात भाजप सत्ता राखणार हे निश्चित होताच त्यांनी स्वत: या योजनेचा आवर्जुन उल्लेख केला. इतकंच नव्हे, तर राजकीय तज्ज्ञांच्या मते, मध्य प्रदेशात भाजपने पुन्हा सरकार स्थापन केले, तर त्यात शिवराजसिंह चौहान यांची 'लाडली बहना योजना' महत्त्वाची ठरेल, असं भाकित वर्तवण्यात आलं होतं. आता राज्यात भाजप पुन्हा सरकार स्थापन करणार असल्याने या योजनेची चर्चा सुरु झाली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram