Election Result 2023 : 2018 निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या 59 जागा वाढल्या, निकालाचं सविस्तर विश्लेषण

Continues below advertisement

Election Result 2023 : 2018 निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या 59 जागा वाढल्या, निकालाचं सविस्तर विश्लेषण 

मुंबई : चार राज्यांच्या रणसंग्रामात तीन राज्ये खिशात घालून भाजपने पुन्हा एकदा वर्चस्व (Assembly Election Result) सिद्ध केलं आहे. हिंदी बेल्टमधील तीनही राज्यांमध्ये भाजपने विजय प्राप्त करून लोकसभेसाठी आपण तयार असल्याचा संदेशही दिला आहे. या निकालांचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार असून राज्यातही भाजप सत्तेवर येईल असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) केला. भाजपच्या या विजयाचं श्रेय त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (J.P. Nadda) यांना दिलं. 

लोकांच्या मनात केवळ मोदीजी असून या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी मोदींवरील विश्वास व्यक्त केल्याचं फडणवीस म्हणाले. ते म्हणाले की, आजच्या निकालांचा कल पाहता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीतही भाजप विजयी होईल यात शंका नाही. एनडीएला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीला लोकांनी नाकारले आहे, त्यांच्या अजेंड्यालाही लोकांनी नाकारलं आहे. लोकांच्या मनामध्ये केवळ मोदीजी आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram