ABP News

Eknath Shinde Oath as Maharashtra DCM :मी एकनाथ शिंदे..उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी घेतली शपथ

Continues below advertisement

Eknath Shinde Oath as Maharashtra DCM :मी एकनाथ शिंदे..उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी घेतली शपथ

राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात (Mahayuti Govt Oath taking Ceremony) राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर आझाद मैदानावरील शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. शिवसेनेचा एक साधा शाखाप्रमुख ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा एकनाथ शिंदे यांचा प्रवास स्वप्नवत असाच म्हणावा लागेल. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने (BJP) एकहाती 132 जागा जिंकल्यामुळे एकनाथ शिंदे यांचे पुन्हा मुख्यमंत्री होण्याचे मनसुबे सफल झाले नसले तरी आताच्या घडीला एकनाथ शिंदे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणातील अविभाज्य घटक झाला आहे.

एकनाथ शिंदे यांची राजकारणातील सुरुवात शिवसेनेतील अन्य कोणत्याही बड्या नेत्याप्रमाणे साधा शिवसैनिक आणि शाखाप्रमुख म्हणूनच झाली होती. मात्र, आता तेच एकनाथ शिंदे हे आज निवडणूक आयोग, न्यायालय आणि जनमताच्या कौलानुसार खरे शिवसेना पक्षप्रमुख झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी 2022 मध्ये बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांचा उल्लेख गद्दार असा केला होता. त्यांना कुत्सितपणे रिक्षावाला म्हणून हिणवले होते. मात्र, त्याच एकनाथ शिंदे यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरेंपेक्षा जास्त आमदार निवडून आणत खरी शिवसेना कोणाची, हे एकप्रकारे ठाकरेंना दाखवून दिले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram