EC Vetoes Counting Day Celebrations: निवडणूक निकालानंतर कोणत्याही जल्लोषावर निवडणूक आयोगाची बंदी

EC Bans Counting Day Celebrations : देशात कोरोना प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांवर बंदी घातली आहे. यासंदर्भातील गाईडलाइन्स आयोगाकडून लवकरच जारी करण्यात येणार आहेत. दरम्यान, 2 मे रोजी पाच राज्यांतील पश्चिम बंगाल, असाम, तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि केरळमधील निवडणुकांचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. त्याचसोबत उत्तर प्रदेशातील पंचायत निवडणुकांचे निकालही याच दिवशी जाहीर करण्यात येणार आहेत. 

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलेलं असताना काही राज्यांत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभा, रॅली आणि रोड शो पार पडत होते. यावरुन देशभरातून निवडणूक आयोगावर टीकास्त्र डागलं जात होतं. सोमवारी मद्रास हायकोर्टानं निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले होते. मद्रास हायकोर्टानं निवडणूक आयोगाला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी जबाबदार ठरवलं होतं. त्याचसोबत सरन्यायाधीश संजीब बॅनर्जी यांनी सांगितलं होतं की, आयोगाच्या अधिकाऱ्यांवर हत्येचा खटला चालवला गेला पाहिजे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola