Delhi Election Result 2025 : दिल्लीतील भाजपच्या विजयाची प्रमुख कारणे
नवी दिल्ली: दिल्लीत गेल्या 15 वर्षांपासून अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे (AAP) एकहाती असलेले वर्चस्व झुगारुन लावत मोदी-शाहांचा भाजप राजधानीची सत्ता हस्तगत करणार, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल (Delhi Election Results 2025) शनिवारी जाहीर झाला. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. त्यानंतर चार तासांमध्ये हाती आलेल्या कलांनुसार, सध्याच्या घडीला भाजप 47 आणि आम आदमी पक्ष 23 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस (Congress) पक्षाला साधे खातेही उघडता आलेले नाही. दिल्लीत सत्तास्थापनेसाठी 37 हा बहुमताचा आकडा आहे. त्यामुळे हे कल कायम राहिल्यास भाजप दिल्लीत सत्ता स्थापन करेल, असे दिसत आहे. हा भाजपच्यादृष्टीने ऐतिहासिक विजय मानला जात आहे. या विजयामुळे तब्बल 26 वर्षांनी दिल्लीत भाजप सत्तेत येणार आहे. मात्र, भाजपच्या या विजयी घौडदोडीबद्दल आम आदमी पक्षाचे नेते धनंजय शिंदे यांनी काही गंभीर आक्षेप उपस्थित केले.