Deglur By Election Results : देगलूर विधानसभेसाठी आज मतमोजणी, कोण मारणार बाजी?
नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवारी 64 टक्के मतदान झाले होते. देगलूर येथे आज, मंगळवारी (2 नोव्हेंबर) या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. तत्कालीन आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे निधन झाल्यानंतर पोटनिवडणूक घोषित करण्यात आली होती. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडीनं देखील जोमानं प्रचार करुन निवडणुकीत रंगत आणल. आज पार पडणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनानं देखील जय्यत तयारी केली आहे. दुपारी 12 वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.