Dadra And Nagar Haveli लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांचा दणदणीत विजय
abp majha web team
Updated at:
02 Nov 2021 05:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसिल्वासा: दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार आणि माजी अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनी आघाडी घेतली आहे. खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली होती. त्यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक घेण्यात आली. दादरा-नगर हवेली लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू असून कलाबेन डेलकर यांनी एकतर्फी आघाडी घेतली आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेच्या कलाबेन डेलकर यांना 1 लाख दोन हजार मते मिळाली असून भाजपचे उमेदवार महेश गावित यांना 56 हजार 636 मते मिळाली आहेत. मतमोजणी अजूनही सुरू आहे.