पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाण्यवर काँग्रेसचं थीम साँग, सोशल मीडियावर गाणं व्हायरल
सध्या संपूर्ण देशावर पुष्पा चित्रपटातील श्रीवल्ली गाण्याची मोहिनी निर्माण झालीय. सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्यामुळं राजकीय पक्षही त्या मोहिनीपासून कसे दूर राहाणार? काँग्रेसनं नेमकं तेच केलं आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या यूपी स्टाईल वक्तव्याला उत्तर देण्यासाठी काँग्रेसनं श्रीवल्लीच्या धर्तीवर थीम साँग लाँच केलंय. हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालंय. यूपीवाला होने पर गर्व है असं काँग्रेसनं या गीतासोबत लिहिलंय. पाहूयात त्या थीम साँगची झलक...