Diwali School Vacation : दिवाळीच्या सुट्ट्यांवरुन शिक्षकांमध्ये संभ्रमाचं वातावरण, काय आहे गोंधळ ?
दिवाळीच्या सुट्ट्यांवरुन शिक्षकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झाल आहे. शालेय शिक्षण विभागाने दिवाळीच्या सुट्ट्यांसंदर्भात काढलेल्या परिपत्रकामुळे हा संभ्रम निर्माण झाला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकात 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्टी जाहीर करण्यात आलीय. याआधी राज्यातील शिक्षण अधिकारी, शिक्षण निरीक्षक यांनी 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्ट्या जाहीर केल्या होत्या. त्यामुळे दिवाळीच्या सुट्या नेमक्या कधी द्यायच्या असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झालाय.
Tags :
Diwali Diwali Vacation Diwali Vacation In Maharashtra Diwali Vacation In Mumbai SSC Diwali Vacation