ममतादीदी जिंकल्या, आता कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून अभिनंदन

मुंबई : अवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे कल हाती येत आहेत. त्यानुसार ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला याठिकाणी स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगाल निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन केले.ममता बॅनर्जी यांनी विजय मिळवला असून आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया, अस उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola