CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यानंतर Ajit Pawar खाली मान घालून खुदूखुदू हसले

Continues below advertisement

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यानंतर Ajit Pawar खाली मान घालून खुदूखुदू हसले

Ajit Pawar: लाडकी बहीण योजनेचा प्रतिसाद पाहून विरोधक गडबडलेत; महायुतीचं रिपोर्ट कार्ड मांडत अजित पवारांचं टीकास्त्र

मुंबई: महायुती सरकारच्या योजना जनतेमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरत आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा प्रतिसाद पाहून विरोधक घाबरले आहेत, असं म्हणणार नाही, पण विरोधक योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून गडबडले आहेत, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. गेल्या दोन वर्षांमध्ये महायुती सरकारने जनतेच्या आयुष्यात बदल घडवून आणला आहे. महिला, उद्योग, रोजगार अशा विविध क्षेत्रात सरकारने अविरत मेहनत घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले. ते बुधवारी महायुती सरकारच्या (Mahayuti) संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी महायुती सरकारचे गेल्या दोन वर्षातील कामगिरीचे रिपोर्ट कार्ड सादर करण्यात आले.

या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी सरकारच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडताना विरोधकांना टोले लगावले. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतंर्गत पाच महिन्यांत महिलांना पैसे देण्यात आले आहेत. या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. लाडक्या बहि‍णींच्या आयुष्यातील सकारात्मक बदल विरोधकांच्या पचनी पडत नाही. मी जबाबदारीने सांगतो की, लाडकी बहीण योजनेसाठी आधी 10 हजार कोटी नंतर 35 हजार कोटींची तरतूद केली आहे. ही योजना तात्पुरती नाही. हे पैसे तुमचा अधिकार आहेत. लाडकी बहीण योजनेच्या पैशात वाढ करण्याचं सुतोवाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्याबद्दल आम्ही विचार करत आहोत, असे अजित पवार यांनी सांगितले.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram