Chhatisgarh CM Vishnu Dev : छत्तीसगडचे नवनियुक्त मुख्यमंत्री विष्णू देव नेमके कोण? कसा आहे प्रवास?
छत्तीसगडचे नवनियुक्त मुख्यमंत्री विष्णू देव साय हे येत्या बुधवारी शपथ घेणार आहेत. रायपूरमध्ये होणाऱ्या या सोहळ्याला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. तसंच, देशाचे गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा हे देखील हजेरी लावतील. साय हे भाजपचे चार वेळा निवडून आलेले खासदार आहेत. २०२० ते २०२२ या काळात ते छत्तीसगड भाजपचे प्रदेशाध्यक्ष होते. माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. तसंच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं देखील त्यांच्याबद्दल मत चांगलं असल्याचं बोललं जातं.