UP Elections : मायावती यांच्या वाढदिवसानिमित्त बसपाच्या 53 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर

Continues below advertisement

बसपा सुप्रीमो मायावती यांनीही आज बसपाच्या 53 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली. मायावती यांनी यावेळी कोणाशीही युती करणार नाही, तसेच त्या स्वतःही निवडणुकीच्या मैदानात उतरणार नाही हे स्पष्ट केले आहे. आज त्यांचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने पहिली यादी जाहीर केलीय. पहिल्या टप्प्यातील 58 जागांपैकी 53 उमेदवारांच्या नावाची यादी मायावतींनी जाहीर केली आहे. शामली, मुजफ्फरनगर, मेरठ, बागपत, गाझियाबाद, हापूड,  गौतमबुद्ध नगर, बुलंदशहर, अलीगढ, मथुरा आणि आग्रा येथील जागांचा समावेश आहे. उर्वरित पाच जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा एक-दोन दिवसात केली जाईल असे मायावती यांनी यावेळी स्पष्ट केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram