BMC Elections: 'वंचित, राजद, मुस्लिम लीग आघाडी एकत्र लढणार'- प्रकाश आंबेडकर ABP Majha

मुंबई महापालिका निवडणुकांचे पडघम वाजू लागलेत. विविध राजकीय पक्षांकडून आरोप-प्रत्यारोपांची राळ उठलीय. त्यातच पालिका निवडणुकांसाठी प्रकाश आंबेडकर यांनी नव्या आघाडीची घोषणा केलीय. वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय जनता दल आणि मुस्लीम लीग या निवडणुका एकत्र येऊन लढवणार आहेत. नव्या आघाडीची घोषणा करताना आगामी काळात आणखी काही नवे पक्ष जोडले जातील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. १५ जानेवारीपर्यंत जागा वाटप जाहीर करण्यात येणार असून मंगळवार म्हणजे उद्यापासून प्रचाराचा नारळ फुटणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola