BMC Elections: मुंबई महापालिकेतील सदस्य संख्या वाढीला मंजुरी, अशी आहे आकडेवारी... ABP Majha
मुंबई महापालिकेतील सदस्य संख्या वाढीच्या प्रस्तावाला राज्यपालांनी मंजुरी दिलीय. त्यामुळे मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या २२७ वरुन २३६ होणार आहे. महापालिकेतील सदस्य संख्या वाढवून प्रभागात बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने दोन महिन्यांपूर्वी घेतला होता. राज्यापालांनी इतर पालिका प्रस्तावाला मंजुरी दिली होती.मात्र मुंबई पालिकेचा प्रस्ताव प्रलंबित होता. मात्र राज्यपालांच्या मंजुरीनंतर मुंबई पालिकेतील सदस्य संख्या वाढीच्या निर्णयाचा मार्ग मोकळा झालाय.