Sunil Mendhe Bhandara Gondiya Lok Sabha : भाजपकडून उमेदवारी मिळाल्यानंतर सुनील मेंढेंची प्रतिक्रिया
Sunil Mendhe Bhandara Gondiya Lok Sabha : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून भाजपने पुन्हा एकदा विद्यमान खासदार सुनील मेंढे यांना पुन्हा संधी दिली आहे. तर गडचिरोली लोकसभा मतदारसंघातूनही पुन्हा एकदा विद्यमान खासदार अशोक नेते यांना संधी देण्यात आली आहे. सुनील मेंढे दुसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीत उतरत आहेत. ते गेले पाच वर्षे भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत.