Gujarat Elections Result 2022 : गुलाल, फटाकी नि ढोल, गुजरातमध्ये भाजपकडून जल्लोषाची तयारी

Continues below advertisement

Gujarat-Himachal Election Results 2022 : गुजरात आणि हिमाचल प्रदेश (Gujarat-Himachal) या दोन राज्यांच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कारण आज या दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकांची मतमोजणी (Assembly Election Results) पार पडणार आहे. या दोन्ही राज्यात सत्तेची सुत्र कोणाच्या हातात जाणार ते आज स्पष्ट होणार आहे. या निकालाकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यातील मतमोजणी केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यात सध्या भाजपचं सरकार आहे. त्यामुळं या दोन्ही राज्यात भाजप सत्ता राखणार की विरोधक त्यांच्याकडून सत्ता खेचून आणणार हे आज स्पष्ट होणार आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबरला मतदान झाले होते. तर गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबरला दोन टप्प्यात मतदान झाले होते. गुजरातमधील 37 केंद्रांवर आज सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी पी. भारती यांनी सांगितले आहे.

गुजरातमध्ये 92 हा बहुमताचा आकडा
मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील मतमोजणी केंद्रांभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. 182 सदस्यीय राज्य गुजरात विधानसभेसाठी बहुमताचा आकडा 92 आहे. गुजरातमध्ये एकूण 64.33 टक्के मतदान झाले आहे. हिमाचल प्रदेशात 12 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात 68 जागांसाठी मतदान झाले होते. हिमाचल प्रदेशमध्ये  75 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. या दोन्ही राज्यात कोण सत्तेत येणार याकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. 

सरुवातीला पोस्टल मतमोजणी होणार 
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 10,000 सुरक्षा कर्मचारी, निवडणूक अधिकारी आणि इतर सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली मतमोजणी केली जाणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) मनीष गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यभरात 59 ठिकाणी उभारण्यात आलेल्या 68 केंद्रांवर सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू होईल. सुरुवातीला पोस्टल मतपत्रिकांची  मतमोजणी सुरू होईल. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता ईव्हीएमवरून मतमोजणी होईल. या निवडणुकीत एकूण 412 उमेदवार रिंगणात आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram