Election : राष्ट्रपती निवडणुकीच्या व्यवस्थापनासाठी भाजपकडून 16 जणांची टीम जाहीर
Continues below advertisement
Election : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सर्वसहमतीचा उमेदवार ठरविण्यासाठी भाजपची धडपड सुरू आहे. भाजपसाठी ही निवडणूक फारशी कठीण नसली तरी मित्रपक्षांसह सर्व विरोधी पक्षांशीही संवाद साधत उमेदवार निश्चित करण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठी आता भाजपने 'मॅनेजमेंट टीम' तयार केली आहे. संपूर्ण निवडणुकीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी या टीमवर असणार आहेत. त्यासाठी भाजपने तयार केलेल्या व्यवस्थापन टीममध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे या महाराष्ट्रातील दोन नेत्यांचा समावेश आहे. तावडे आणि भाजपचे सरचिटणीस हे दोघे या टीमचे सहनिमंत्रक आहेत. तर केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत टीमचे निमंत्रक आहेत. एकूण 14 जणांची ही टीम काम करणार आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv