पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा आखाडा : वडील भारत भालकेंसारखा पोशाख करून भगीरथ भालकेंचा निवडणूक अर्ज
पंढरपूर : दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके तर भाजपकडून समाधान अवताडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पंढरपूरची विधानसभा पोटनिवडणूक (Pandharpur By Election) या दोन तरुण नेत्यांमध्ये होणार आहे. उद्या दोन्ही उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. अशातच आज भाजप आणि राष्ट्रवादीने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे.