Ashish Shelar : अजुन संपूर्ण निकाल बाकी, हिमाचलच्या निकालावर सूचक वक्तव्य ABP Majha

Continues below advertisement


Gujarat Election Record break Win: गुजरात निवडणुकीचे सुरुवातीचे कल हाती येत असून भाजपकडे (BJP) 150 जागांवर आघाडी असल्याचे दिसून येत आहे. भाजपने जर 150 किंवा अधिक जागांवर विजय मिळवल्यास हा गुजरात विधानसभा निवडणुकांमधील (Gujarat Assembly Election Recordbreak Winning) सर्वात मोठा विजय ठरणार आहे. सध्याच्या कलानुसार, भाजपने 20 वर्षांपूर्वीचा सर्वाधिक जागा जिंकण्याचा विक्रम

मागे टाकला आहे. आता, काँग्रेसपेक्षाही (Congress) मोठा विजय मिळवणार का, याकडे लक्ष लागले आहे. माधवसिंह सोळंकी (Madhav Singh Solanki) यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने 1985 मध्ये 149 जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुकीनंतर काँग्रेसच्या जागांमध्ये घट झाली. 

Gujarat Election Result Live  : काँग्रेसला सर्वाधिक जागा (Congress Gujarat Eleciton Record)
गुजरातमध्ये काँग्रेसची मोठी राजकीय ताकद होती. त्यांच्यानंतर जनसंघ, जनता दल आणि भाजपने काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का दिला आहे. गुजरातमध्ये झालेल्या 1980 मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वाधिक 141 जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर 1985 च्या विधानसभा निवडणुकीत 149 जागांवर विजय मिळवला होता. या निवडणुका माधवसिंह सोळंकी यांच्या नेतृत्त्वात लढवण्यात आल्या होत्या. 

1985 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 149 जागांवर विजय मिळला होता. तर, जनता पार्टीला 14 आणि भाजपला 11 जागांवर विजय मिळवला होता. अपक्षांनी 8 जागांवर विजय मिळाला होता. त्यावेळी अमरसिंह चौधरी हे मु्ख्यमंत्री झाले होते. 1989 मध्ये माधवसिंह सोळंकी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पुन्हा आली. चौधरी हे गुजरातचे पहिले आदिवासी मुख्यमंत्री होते. 

1980 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 141 जागांवर विजय मिळाला होता. तर, जनता पार्टीला 21 आणि जनता पार्टी (सेक्युलर)1 आणि भाजपला 9 जागांवर विजय मिळाला होता. त्याआधी 1980 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 141 जागांवर विजय मिळाला होता. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram