Amravati : बँकेच्या 17 संचालक पदांसाठी 48 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात, आज मतमोजणी : ABP Majha

अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची काल निवडणूक पार पडली. यावेळी 94 टक्के मतदान झाले. यामध्ये पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचं सहकार आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांचं परिवर्तन पॅनलमध्ये थेट लढत झाली. या निवडणुकीत राज्यमंत्री बच्चू कडूसह तीन आमदार आणि अन्य दिग्गज नेते मैदानात उतरले होते. या सगळ्यांचा फैसला आज होणार आहे. 11 वाजेपर्यंत निकाल येणं अपेक्षित आहे. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यामध्ये कोण बाजी मारणार यशोमती ठाकूर की बच्चू कडू याकडे सगळ्यांच लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे या निवडणुकीत सगळ्यांच लक्ष लागलं ते चांदूरबाजार कडे. कारण याठिकाणी बच्चू कडू विरुद्ध बबलू देशमुख यांच्यात काटे की टक्कर आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola