Amol Kirtikar Win Lok sabha : मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तिकर विजयी

Continues below advertisement

Amol Kirtikar Win Lok sabha : मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तिकर विजयी झाले आहेत. 

हे देखील वाचा

Vishal Patil Win Sangli Lok Sabha Result 2024 : सांगलीतून अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे विजयी झाले असून त्यांनी भाजपच्या संजयकाका पाटील आणि महाविकास आघाडीच्या चंद्रहार पाटील यांचा पराभव केला आहे. विशाल पाटील हे सुरुवातीपासून आघाडीवर होते, त्यांनी शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवत सांगली आपलीच असल्याचा संदेश दिला. 

लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक चर्चेत आलेला आणि जागावाटपामध्ये वादग्रस्त ठरलेला मतदारसंघ म्हणजे सांगली. महाविकास आघाडीने राज्यभर समन्वय साधून, भाजपविरोधात एकदिलाने काम केलं असलं तरी सांगलीत मात्र त्यांची दिलजमाई झाली नाही. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील, भाजपकडून संजयकाका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील यांच्यातील तिरंगी लढतीत विशाल पाटलांनी बाजी मारली.

सांगली लोकसभेसाठी यंदा जवळपास 61 टक्के मतदान झालं. त्यामध्ये खरी लढत ही अपक्ष विशाल पाटील आणि भाजपचे संजयकाका पाटील यांच्यात झाली. विविध एक्झिट पोलमध्येही विशाल पाटील हेच आघाडीवर असल्याचं सांगितलं गेलं. जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी चंद्रहार पाटलांना मदत न करता अपक्ष असलेल्या विशाल पाटलांना मदत केल्याचं उघड झालं.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram