Amol kirtikar VS Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईत अमोल कीर्तिकर एका मतानं आघाडीवर ABP Majha

Continues below advertisement

Amol kirtikar VS Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबईत अमोल कीर्तिकर एका मतानं आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे. 

हे देखील वाचा

Uddhav Thackeray on Sangli Loksabha Result : सांगलीत विशाल पाटलांचा दणदणीत विजय; उद्धव ठाकरे मोजक्याच शब्दात काय म्हणाले?

मुंबई : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीने दमदार यश मिळवल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याचबरोबर त्यांनी भाजपवर सुद्धा जोरदार हल्लाबोल केला. सर्वसामान्य माणसाने सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते, ते दाखवून दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राज्यामध्ये महाविकास आघाडीने मिळवलेल्या दमदार यशानंतर शिवसेना भवनमध्ये उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली. 

 

विशाल पाटील आमच्यातच येतील

दरम्यान, सांगली लोकसभेला विशाल पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपच्या संजय काका पाटील आणि ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांचा पराभव करत विजय मिळवला. मात्र, सांगलीमध्ये ठाकरे गटाकडून उमेदवार देण्यात आल्यानंतर काँग्रेसकडून कडाडून विरोध करण्यात आला. त्या जागेवरती दावा कायम ठेवण्यात आला होता. मात्र ठाकरेंनी सुद्धा माघार न घेत चंद्रहार पाटील यांची उमेदवारी कायम ठेवली होती. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना सांगलीच्या निकालवरून विचारण्यात आला असता त्यांनी सांगितले की, सांगली बाबत आमचा निकाल चुकला असून पण विशाल पाटील आमच्यातच येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram