Health Departmemt ची परीक्षा पुढे का ढकलली? परीक्षा होणार तरी कधी? नवीन तारीख कधी जाहीर होणार?

मुंबई : राज्यात आज आणि उद्या आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा (Maharashtra Health Department Exam) घेतली जाणार होती. पण नेहमीप्रमाणे ऐनवेळी ही परीक्षा रद्द झाल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आली. आज आणि उद्या होणारी परीक्षा ही रद्द झाल्याची माहिती शुक्रवारी रात्री नऊ वाजता राज्याच्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यामुळे परीक्षांच्या आयोजनाच्या बाबत राज्य सरकारचा गोंधळ कायम असून त्यामुळे जवळपास आठ लाख विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय. परीक्षा ऐनवेळी रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी माफी मागतो, अशी प्रतिक्रिया  आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola