HSC Exam 2021 : विद्यार्थ्यांनी बारावीचा अभ्यास करावा की प्रवेश परीक्षांचा? HSC चा निर्णय कधी घेणार?
Continues below advertisement
मुंबई : बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्य शिक्षण मंडळानं बारावीची परीक्षा पुढे ढकलली आहे. आता बारावीच्या परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत परीक्षेचा अर्ज भरता येणार आहे. पण त्यासाठी विद्यार्थ्यांना 8,250 रुपये परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे. 23 एप्रिलपासून परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत विद्यार्थ्यांना अतिविशेष अतिविलंब शुल्कासह परीक्षा अर्ज भरता येईल. कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा अर्ज शेवटच्या क्षणापर्यंत भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
Continues below advertisement