SSC Result : अंतर्गत मूल्यमापनद्वारे तयार करण्यात आलेल्या निकालाबाबत शिक्षकांचं म्हणणं काय?

Continues below advertisement

मुंबई : दहावीचा निकाल ( SSC Result 2021)उद्या जाहीर होणार आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे दहावीचा निकाल यंदा जवळपास एक-दीड महिना उशीरा लागला आहे. उद्या दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.  


राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता यंदा राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देण्याचा शासन निर्णय शिक्षण विभागाने घेतला. यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे निकष सुद्धा ठरवले होते. या मूल्यमापनाच्या आधारे उद्या दहावीचा निकाल दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहे.  बोर्डाच्या  www.mahahsscboard.in  या अधिकृत संकेसस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाबाबत माहिती दिली. यावर्षी पहिल्यांदाच दहावी बोर्ड परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे हा निकाल पूर्णपणे अंतर्गत मूल्यपामनद्वारे तयार करण्यात आला आहे.


दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना खालील संकेतस्थळावर पाहता येतील


www.mahahsscboard.in


दहावीची परीक्षा यावर्षी 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र त्याच दरम्यान राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहता ही परीक्षा रद्द करण्यात आली. विद्यार्थ्यांना इयत्ता नववी आणि दहावीच्या मिळवलेल्या गुणांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्याच्या सूचना करण्यात आल्या. यामध्ये इयत्ता नववी मिळालेले 50 टक्के गुण व दहावीत वर्षभरात  अंतर्गत मूल्यमापनाचे 50 टक्के गुण एकत्र करून हा निकाल तयार करण्याचे आदेश शाळांना देण्यात आले होते. त्यानुसार शाळांनी मुख्यध्यापकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करून विषयनिहाय गुण विद्यार्थ्यांना देऊन हा निकाल बोर्डाकडे पाठवला. त्यानंतर बोर्डाकडून या शाळेकडून आलेल्या निकालावर योग्य ते काम करून उद्या हा निकाल जाहीर करण्याचे ठरवले आहे. दहावीच्या निकलाबाबत विद्यार्थी समाधानी नसल्यास त्यांना परिक्षेचा देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. यावर्षी दहावीच्या परिक्षेसाठी एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.  यामध्ये 9 लाख 9 हजार 931 मुले तर 7 लाख 48 हजार 693 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती आता या परीक्षेचा उद्या निकाल लागणार आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली आहे.
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram