School Reopen : 17 ऑगस्टपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय,पालकांच्या काय प्रतिक्रिया

Continues below advertisement

मुंबई : राज्यात कोरोनाची स्थिती हळूहळू नियंत्रणात येत आहे. त्यामुळे गेल्या वर्ष-दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा लवकरच पुन्हा गजबजणार आहेत. राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार सुरु आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक पार पडणार आहे. सध्या आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू आहेत. उर्वरित वर्ग लवकरच सुरू होणार आहेत.  

ब्रेक द चेन अंतर्गत 1 ऑगस्टला जारी झालेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. मार्च 2020 पासून राज्यातील शाळा कोरोनामुळे बंद आहेत. आता लवकरच शाळा सुरू करण्याच्या शिक्षण विभागाच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. आज मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पहिली बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड उपस्थित होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram