Uday Samant:पदवी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा नसणार,बारावीच्या गुणांवरच पदवीचे प्रवेश:उदय सामंतABPMajha
कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी उद्यापासून बारावीच्या निकालानुसारच प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारची सीईटी नसून नेहमीप्रमाणेच मेरीटलीस्टनुसार प्रवेश होणार असल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत दिली. पुढील शैक्षणिक वर्ष सुरु करण्यासाठी त्या-त्या जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती पाहून आम्ही आठ दिवसांत निर्णय घेणार आहोत. त्यासाठी प्रशासनाशी आम्ही चर्चा करत असल्याचीही त्यांनी माहिती दिली.
Tags :
Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Uday Samant Cet ABP Majha ABP Majha Video