Students Protest | 50% अभ्यासक्रमात कपात करा, SSC HSC विद्यार्थ्यांचं लातूर बोर्डासमोर आंदोलन
परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान 35 टक्के गुण मिळण्याचा निकष आहे. पण यंदा कोविडमुळे शिक्षणात अडथळा आला आहे. शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षणाची परिस्थितीही सगळेच जाणतात. अशा स्थितीत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्णतेचा निकष 35 ऐवजी 25 टक्के करावा, अशी सूचना विदर्भ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने केली आहे.