SSC : दहावी बोर्ड परीक्षेचे  हॉल तिकीट 18 फेब्रुवारीपासून ऑनलाईन उपलब्ध, पाहा कसं मिळणार Hall Ticket

Continues below advertisement

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी.... दहावी बोर्ड परीक्षेचे  हॉल तिकीट 18 फेब्रुवारी म्हणजेच उद्या दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. दहावीची परीक्षा 15 मार्चपासून सुरू होतेय तत्पूर्वी हे हॉल तिकीट शाळेकडून प्रिंट करून आणि मुख्याध्यापकांची सही, शिक्क्यासह विद्यार्थ्यांना वितरित केले जाणार आहे. बोर्डाच्या संकेतस्थळावर हे हॉल तिकीट उपलब्ध असेल. शाळांनी त्यांच्या कॉलेज लॉगिनमधून हे हॉलतिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना वितरीत करावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत या संदर्भात काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram